काय सांगता? लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ? महिलेने उद्धव ठाकरेंना सगळं सांगितलं, नेमकं काय घडलं?


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेमुळे घराघरात भांडण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे नवरा बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली आहे. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकरी महिलेने लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंबात समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका आंदोलक महिला शेतकऱ्याने सरकारच्या अटी नियमांवर आक्रमक भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे एका कुटुंबात घटस्फोटाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे एका शेतकरी कुटुंबात मोठी समस्या उभी राहिली आहे. या योजनेतील अटींमुळे नवरा-बायकोच्या संसारात वादळ निर्माण झाले आहे. यामुळे ते थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

माझा नवरा गाडी घेण्याच्या विचारात होता. मात्र, गाडी घेतल्यास लाडकी बहीण योजनेतून मिळणारे दीड हजार रुपये बंद होतील या भीतीने मी त्याला विरोध केला. यावरुन आम्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. आता हे भांडण टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे, अशी तक्रार त्या महिला शेतकऱ्याने केली.

दरम्यान, या घटनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या योजना कशा कुटुंबांमध्ये फूट पाडत आहेत यावरुन जोरदार टीका केली. लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धाराशिव येथील चौपालमध्ये आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. या सरकारने फसवे पॅकेज जाहीर केले आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, फक्त आमच्या मालाला हमीभाव द्या. शेतकऱ्याला तुमची भीक नकोय. त्याला त्याच्या हक्काचा भाव हवा आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!