दीड हजार घेताना मनाला काय वाटलं नाही का? अडीच हजार लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, लाखात पगार तरी दीड हजारांचा मोह सुटेना


मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं म्हणून लाडकी बहीण योजना ही गेल्या जुलै महिन्यात सुरू केली होती. त्याद्वारे लाभार्थी महिलाना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. असे असताना अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे.

या योजनेचे दीड हजार रुपये मिळवण्याचा हावरटपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महिलांचा सरकारी कार्यालयांमध्ये काम करून, 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ घेऊन, गलेलठ्ठ पगार घेऊनही काही सरकारी कर्मचारी महिलांची हाव सुटलेली नाही. यामुळे त्यांच्या मनाला हे पैसे घेताना काय वाटले नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यातील तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले. याच पार्श्वभूमीवर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात येणार असून फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे हे पैसे वसूल करण्याची मागणी होत आहे.

अडीच हजारांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे उघड झाले असून या बातमीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यामध्ये सरकारची देखील चूक असल्याचे सांगितले जात आहे. मतांसाठी नीट पडताळणी केली नसल्याने ही बाब घडली आहे.

यामध्ये 9 महिन्याचे मिळून 13 हजार 500 रुपये त्या महिलांनी लाटले. एकूण हा आकडा 3 कोटींपेक्षा जास्त होत आहे. लाडकी बहीण योजना ही गरीब , महिलांसाठी असून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नसल्याचे, आधीच सांगितले होते. असे असताना तरीही सरकारी कर्मचारी महिलांचा पैशांचा मोह काही सुटला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!