आमचं काय बोलणं झालं ? ओळखा पाहू…!

मुंबई : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोसह मुंबईतील 38,800 कोटींच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा दिसून आली.मोदी यांनी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मेट्रोतून प्रवासही केला. याप्रसंगाचा एक फोटो ट्विट करत फडणविस यांनी नेटकऱ्यांना एक कोडं टाकलं आहे.
मेट्रोतील प्रवासाचा एक फोटो ट्विट करत फडणविस यांनी , “आमचं काय बोलणं झालं असेल, ” हे ओळखण्यास युझर्झना सांगितले आहे. फडणवीस यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर युझर्सकडूनही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
कालदेखील बीकेसीतील शिंदे यांच्या भाषणाला पंतप्रधानांनी दाद दिली. शिंदे म्हणाले की, ‘दावोसला मला अनेक देशांचे पंतप्रधान, अध्यक्ष भेटले. ते फक्त मोदी साहेबांबद्दलच विचारायचे. ‘मी मोदींचा भक्त आहे,’ असे सांगून लक्झेम्बर्गच्या पंतप्रधानांनी माझ्यासोबत फोटो काढला व तो मोदींना दाखवा, अशी विनंती केली. जर्मनी, सौदीचे लोकही तिथे भेटले. त्यांनी मला विचारलं, तुम्ही मोदींसोबत आहात ना? मी हो म्हटले, मी तर मोदींचाच माणूस आहे.’ शिंदेंचे हे भाषण ऐकून मोदींनाही हसू आवरले नाही.