प्राथमिक अहवालात AAIB नं कोणता निष्कर्ष काढला? किती गांभीर्याने अहवाल बनवला ; रोहित पवारांची शंका..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल कालच समोर आला. या प्राथमिक अहवालावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की, अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एएआयबीने नेमका कोणता निष्कर्ष काढला आहे. या अहवालाच्या आधारावर सीआयडी कसा तपास करणार, यावरही त्यांनी सवाल केले आहेत.तसेच या अहवालातील पान क्रमांक चार, मुद्दा क्रमांक ५.१ वरील “बारामती विमानतळ महाराष्ट्राच्या बारामती जिल्ह्यात आहे” या वाक्यावर आक्षेप घेतला आहे. या एका वाक्यावरून एएआयबीने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला आहे, अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

या प्राथमिक अहवालात VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता, अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा, टेबल-टॉप रनवे तसेच फिकट मार्किंग, मानवी घटक/दृश्य भ्रम , MET माहितीची मर्यादित अचूकता अशी काही या अपघाताची कारणं दिली आहेत. विमानतळावर रनवे मार्किंग फिकट फिकट होती. सोबतच रनवेवर सैल खडी, पुरेशी कुंपण/सीमा भिंत नाही असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

तसेच रोहित पवारांनी यावर आपण सोमवारी बोलणार असल्याच देखील स्पष्ट केल आहे.“बारामती विमानतळ महाराष्ट्राच्या बारामती जिल्ह्यात आहे हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल.’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!