लाडकी बहीण योजनेस पात्र होण्यासाठी राज्यात इतक्या वर्ष रहिवासी असल्याचा लागणार पुरावा ! रहिवासी असल्याबाबत काय लागणार अट….

Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. खासदारकीच्या निवडणुकीत महायुतीचे अनेक दिग्गज नेते पराभूत झालेत. या पराभवातून धडा घेत महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर अनेक निर्णय घेतले आणि अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्यात.
लाडकी बहीण योजना ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना. महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली असून याचा नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा लाभ पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. विशेष बाब अशी की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित रित्या महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे 2,100 रुपयांपर्यंत वाढवू असे आश्वासन दिलेले आहे. यामुळे याकडे देखील महिलांचे लक्ष आहे. कधीपासून लाडक्या बहिणीना 2100 रुपये मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
दुसरीकडे या योजनेबाबत महिलांमध्ये काही प्रश्न देखील आहेत. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी किती वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी असावे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आज आम्ही तुम्हाला याचं सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.
लाडकी बहीण योजनेच्या अटी काय आहेत?
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना दिला जातो. परराज्यातील महिला यासाठी अपात्र ठरतात.
* या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जातो.
*अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो.
*ज्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला किंवा आमदार खासदार *नाहीयेत त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो.
* या योजनेचा लाभ परराच्या जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रात रहिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेल्या महिलांना सुद्धा मिळतो. अशा प्रकरणांमध्ये सदर महिलेच्या पतीचे डॉक्युमेंट्स योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असून एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार हे विशेष.
लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे आधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. लाभार्थी महिलेकडे जर आधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वी रेशन कार्ड असले तरी चालेल. म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 15 वर्ष महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो.