प्रेमासाठी काय पण! घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह, 10 वर्षांच्या संसारात सासरच्यांकडून छळ, पुण्याच्या सायलीसोबत घडल भयंकर…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणीने प्रेमासाठी आपल्या कुटुंबांचा विरोध पत्करला. धर्म परिवर्तन करून प्रियकरांशी विवाह केला आणि आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.मात्र मागील दहा वर्षांपासून नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने छळ केला जात होता. आता अखेर तिने काही हिंदू संघटनांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत शुद्धीकरण करून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,सायली सूर्वे असं या तरुणीचं नाव आहे. तिने 2016 मध्ये घरच्यांचा विरोध झुगारून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आतिफ तासे याच्यासोबत विवाह केला होता. लग्नानंतर तिने धर्म परिवर्तन केलं होतं. तिचं सायली नाव बदलून अलिझा नाव ठेवण्यात आलं होतं. मात्र लग्नानंतर नवऱ्यासह तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याचा आरोप सायलीनं केला आहे.
लग्नानंतर सुरू असलेल्या कौटुंबिक छळामुळे तिच्या आयुष्याचा नरक बनल्याचा आरोप तिने केला आहे. दहा वर्ष संसार करताना तिला अनेक संकटाचा सामना करावा लागला.चार मुलांची आई झाल्यानंतर ही परिस्थितीt सुधारणा नाही अखेर सासरच्या छळ्याला कंटाळून तिने मोठे पाऊल उचलले

या प्रकरणी तिने काही वेळा पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून तिची दखल घेतली गेली नाही. अलीकडेच ती काही हिंदू संघटनांच्या संपर्कात आली. यानंतर तिची सुखरूप सुटका करण्यात आली. तिचं शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला आहे. तिचं नवं नाव अद्या सुर्वे ठेवण्यात आलं आहे.
आतिफशी लग्न करणं, आपली मोठी चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केल्या गेल्याचा आरोप सायलीने केला.त्यांच्या सुरक्षेसाठी आपण लग्नातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. संपूर्ण प्रकरणावर अद्याप सायलीचा पती अथवा सासरच्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.