भाजपासोबत गेले आणि अजूनच अडचण वाढली, राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांबाबत मोठी बातमी आली समोर…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांचे अनेक घोटाळ्यात नाव आल्याने त्यांनी असे केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

आता मात्र महाराष्ट्र राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले होते.

या आरोपपत्राची विषेश ‘पीएमएलए’ (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट) कोर्टाकडून दखल घेतली आहे. यावेळी जरंडेश्वर एस.एस.के. कारखान्याच्या गहाण मालमत्तेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी बँकांनी २२६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले.

यामध्ये आर्थिक फायद्याासठी कारखान्याची मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण्यांनी कवडीमोल दराने संपादीत केल्याचे निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले आहे. यामुळे आता अजित पवार अडचणीत आले आहेत.

रविवारी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे आता तरी ते चौकशीतून मुक्त होतील, असे म्हटले जात होते. दरम्यान, आरोपपत्राची आता विषेश ‘पीएमएलए’ कोर्टाकडून दखल घेतली आहे. यावेळी न्यायाधीश देशपांडे यांनी काही निरीक्षण नोंदवले आहेत.

या प्रकरणी संबंधित लोकांना ‘समन्स’ बजावण्यात आलेले आहेत. तसेच आरोपपत्रानुसार या घोटाळ्याच्या माध्यमातून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी मोठा आर्थिक फायदा करून घेतला.

त्यांना कवडीमोल दराने त्यांना कारखाना मिळाला. त्यांनी या कारखान्याच्या नावावर पुणे जिल्हा बँकेकडून ८२६ कोटी रुपायंचे कर्ज घेतले. काही पैसे परदेशात देखील पाठवल्याचे यात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!