राज्यातील १० हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार? युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा…


पुणे : इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम केटरर्सवर होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात केटरर्स आहेत जे लग्नातील जेवणाच्या ऑर्डर घेतात, परंतु गॅसच्या तुटवड्यामुळे त्यांना ऑर्डर रद्द कराव्या लागत आहेत.

यामुळे राज्यातील १० हजार लग्नं पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पुढील दोन महिन्यांत तब्बल दहा हजार लग्न सोहळे होणार आहेत.मात्र हे लग्न सोहळे पुढं ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आनंदाच्या क्षणी हे संकट उभं ठाकल्यानं लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पाहायला मिळत आहे.

युद्धामुळं गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, परिणामी शहरातील साडे चारशे केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करत आहेत, केटरर्सकडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात ही झाली आहे. त्यामुळं लग्न सोहळे पुढं ढकलायचे का? असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली आहे.

त्यातून ही अधिकचे पैसे मोजून गॅसची जुळवाजुळव केल्यास, केटरर्स प्रती थाळीमागे १० ते २० टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी हवी असल्यास खिश्याला चाप ही बसू शकतो.

मात्र काहीही केलं असता गॅस उपलब्ध झालाच नाही तर मात्र केटरर्सना मोठा फटका बसणार आहे. सोबतचं त्यांच्याकडील 45 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ही निर्माण होणार आहे. आनंदाच्या क्षणी ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट निर्माण झालं आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!