खासदार सुप्रिया सुळेंच्या घरी लग्नाची लगबग ; लेक रेवती सुळे नागपूरची सून होणार,जावई कोण?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात आता सनई चौघडे वाजणार आहे. त्यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न ठरलं ठरल्याची माहिती मिळाली आहे. सुप्रिया यांच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीनं इन्टावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत.शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न उद्योजक सारंग लखानी यांच्याशी लग्न ठरलं आहे. त्यामुळे रेवती सुळे या नागपूरची सून होणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांचं लग्न ठरल्याची माहिती समोर आली आहे.
सारंग लखानी हे विश्वराज ग्रूपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग लखांनी हे एक चांगले बॅडमिंटन पटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतलेला आहे.या दोघांचा विवाह सोहळा कधी होणार आहे याबाबतची माहिती किंवा तारीख अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान या आनंदाच्या क्षणाची माहिती देत सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे यानेही आपल्या बहिणीसाठी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत..