Weather Update : काळजी घ्या! आज राज्यात ‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट, कसं असेल वातावरण? जाणून घ्या…


Weather Update : राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पाऊस जोरदार सुरु आहे अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, आज राज्यातील हवामान नेमके कसे राहिल याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे. १८ जूननंतर मुंबईत पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. Weather Update

राज्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. हा पावसाचा जोर किती दिवस राहणार? याबाबत प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २२ जून पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे.

दरम्यान, आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. १५ जूनपासून ते १७ जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. परंतू, या कालावधीतही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे. १५ जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!