Weather Update : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांना आज धो धो पाऊस बरसणार, ऑरेंज अलर्टही दिला, गारपिटीची शक्यता..


Weather Update : डिसेंबर महिन्यात देखील राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरच राहणार आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

राज्यातील आज देखील काही भागात मेघजर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाडा विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासाह गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या महितनुसार हवेची चक्रीय स्थिती जी उत्तर पूर्व अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर आहे व द्रोणीय रेषा जी उत्तर महाराष्ट्रावर होती ती आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशामधून जात आहे.

तसेच ठळक कमी दाबाचे क्षेत्र जे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर आहे त्याची तीव्रता पुढील २४ तासात वाढण्याची शक्यता आहे. त्याची वाटचाल ही वेस्ट नॉर्थ वेस्ट वर आहे. Weather Update

या सर्व सिस्टीम मुळे ४ डिसेंबर नंतर राज्यात आद्रते सोबत ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४८ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेध शालेने वर्तवली आहे.

दरम्यान, आज मराठवाड्यात व पुढील दोन दिवस विदर्भात मेघगर्जना जास्त होण्याची शक्यता आहे. विदर्भात विशेषता: अकोला, अमरावती बुलढाणा वाशिममध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!