Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा धो- धो!! हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा…


Weather Update : राज्यात विविध भागात परतीच्या पावसाचा जोर कायम असून आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरसह सातारा, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने इशारा दिला आहे.

तसेच पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. परंतु पुणे शहरात आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात २५ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

सातारा जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, मान या ठिकाणी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील. साताऱ्यात आज २६ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. Weather Update

सांगली जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून मिरज, विटा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जत, आटपाडीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. आज सांगलीत २८ अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूर मध्ये 26 अंश कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!