Weather Update : कडाक्याच्या थंडीत अवकाळी पावसाचा इशारा, राज्यात थंडीची लाट, जाणून घ्या…


Weather Update : राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. नागरीकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्याचबरोबर सर्वत्र दाट धुक्यांची चादर पसरली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावेळी शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण करणारी परिस्थिती आहे.

राज्यात थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. तापमानात देखील चढ उतार होत आहे. Weather Update

त्याचवेळी हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुढील ४ ते ५ दिवसात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. बोचऱ्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना दिवसभर बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

अचानकच आलेल्या थंडीमुळे राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्ट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यात जळगावात तापमान कमी होते. किमान तापमान ९ अंश तर कमाल २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!