Weather Update : पुणेकरांनो थंडीची येणार लाट! राज्यातही येत्या २४ तासांत तापमानात होणार मोठे बदल, जाणून घ्या IMD चा अंदाज..


Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांना मोठा फटका बसला. महाराष्ट्रातही यामुळे अनेक ठिकाणी पाऊस झाला. ऐन हिवाळ्यात पाऊस झाल्याने राज्यातून थंडी नाहीशी झाली होती.

मात्र, कालपासून पुन्हा गारठा जाणवू लागला आहे. पुणेकरांना येत्या काही दिवसांत हुडहुडी भरणार आहे. राज्यातही येत्या पाच दिवसात तापमानात मोठे बदल होणार आहेत असे हवामान विभागाने नोंदवले. उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत.

पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर राजस्थानमध्ये थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत आहेत.दरम्यान, पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात तापमानात घट होणार असल्याचं हवामान विभाग, पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी सांगितले आहे.  Weather Update

येत्या ५ दिवसात पुणेकरांना प्रचंड गारठ्यात रहावं लागणार आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात १३ ते १४ अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान ११ अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस म्हणजे बुधवार दिनांक १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी) पर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार 10 डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!