Weather Update : राज्यात हिवाळ्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट, तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार, जाणून घ्या…


Weather Update : राज्यात हिवाळा सुरु झाला असून अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. राज्यात आता हिवाळ्यात पावसाचा अलर्ट आला आहे. राज्यात चार दिवस कुठे यलो आणि कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. २५ ते २६ नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील फक्त जळगाव जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्हा वगळता इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. Weather Update

कोकणातही २५ नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे.

काही ठिकाणी गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात आपला कापूस किंवा इतर काही माल ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!