Weather Update : राज्यात हिवाळ्यात पावसाचा अनुभव, या भागांत पडणार पाऊस, थंडीला लागणार ब्रेक…

Weather Update : राज्यातील थंडी मागील दोन दिवसांपासून कमी झाली. तसेच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात मागील आठवड्यात थंडी वाढली होती. आता या थंडीला ब्रेक लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे. परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे. Weather Update

राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार आहे. तसेच २६ ते २८ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार ३० डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. यामुळे या दिवसात शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर, सांगली, धाराशिव, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.