Weather Update : राज्यात ऐन थंडीत कोसळणार पाऊस, ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अंदाज, जाणून घ्या…

Weather Update : राज्याच्या काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Weather Update


आज महाराष्ट्रासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना वायू प्रदूषणामध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ८) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टी भागात सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. Weather Update
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ११ नोव्हेंबरपर्यंत येथे पाऊस संपण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, ओडिशा आणि गोव्यातही पाऊस पडू शकतो.
