Weather Update : राज्यात १७ ते २० एप्रिल दरम्यान ‘या’ भागात जोरदार पाऊस! कोणत्या जिल्ह्यात बरसणार वादळी पाऊस? जाणून घ्या..
Weather Update : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. यावेळी अवकाळी पाऊस विदर्भात नव्हे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात बरसणार आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतचा आपला नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
काल, मंगळवारी राज्यातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आज पासून पुढील चार दिवस पावसाचे राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
तसेच अवकाळी पावसाचा मुक्काम २० एप्रिल पर्यंत राहणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे २० एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यातील कोकण विभागात १७ ते २० एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र बाबत बोलायचे झालं तर येथे आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Weather Update
दरम्यान, राठवाडा विभागात देखील आज आणि उद्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. IMD ने या कालावधीत पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. वादळी पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंग झालेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पशुधनाची देखील काळजी घ्यावी असे जाणकारांनी सांगितले आहे.