Weather Update : राज्यात ‘या’ भागात मुसळधार पाऊस, खरीप हंगाम फुलणार, बळीराजा सुखावणार…
Weather Update : राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
राज्याच्या अनेक भागात सध्या चांगला पाऊस होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेती कामांना वेग आला आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावेळी चांगलाच बहरणार आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील केल्याचे चित्र आहे. Weather Update
अशातच आता हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.