Weather Update : राज्यात मान्सून होणार सक्रिय! जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईत मुसळधार पाऊस पडणार, जाणून घ्या…
Weather Update : मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून त्याने उघडीप घेतल्याने पुन्हा एकदा प्रतीक्षा सुरू झाली होती. आता मान्सुन पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होत आहे. दरम्यान, याबाबत माहिती देताना पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, आगामी चार दिवसात राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची स्थिती सुधारेल. पावसात हळूहळू वाढ होईल.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात आणखी वाढ होऊ शकते. तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. शनिवारी पहाटेपासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसेच रायगडमध्ये पाऊस सुरू आहे. Weather Update
पावसामुळे सखल भागात पाणी शिरलं असून मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, पुढील ३-४ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.