Weather Update : पुन्हा पावसाचा अंदाज! पश्चिम महाराष्ट्रातील आज ढगाळ हवामान, जाणून घ्या संपूर्ण अंदाज..


Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, वातवरणातील बदलामुळे पावसासाठी पुरक वातावरण निर्माण होत आहे. यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट आहे. अनेक जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्याचं कमाल तापमान आज ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.

सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी थंडीचा कडाका जाणवत आहे. तर ३१ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात आज ३१ अंश सेल्सिअस कमाल तर २० अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

सांगली जिल्ह्यात पावसाची पावसाची शक्यता असून आज आकाश अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगलीत आज ३२ 22अंश कमाल तर २२ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. Weather Update

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात देखील सकाळी थंडी वाढत असून धुकं पडत आहे. आज आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. कोल्हापुरात आज ३१ अंश सेल्सिअस कमाल तर २१ अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात आज आकाश निरभ्र राहणार आहे. उद्या, ३१ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज 33 अंश सेल्सिअस कमाल तर २३ अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!