Weather Update : सावधान! स्वतःला संभाळा, मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेची शक्यता, कुठे होणार उन्हाचा उद्रेक, जाणून घ्या….

Weather Update : भारतीय हवामान खात्याने एक अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मे महिन्यात भारतातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल आणि उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या सुमारे 2 ते 8 दिवसांनी अधिक असेल. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आली आहे.

येत्या काही दिवसांत दिल्लीसह भारतातील बहुतांश भाग उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार आहेत. देशातील बहुतांश राज्यांमध्ये एप्रिल महिना सुरळीत गेला. त्याचवेळी, मे महिन्याच्या सुरुवातीस देखील महिन्याच्या शेवटी डोंगरावर बर्फवृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे.
असे असले तरी येणारे दिवस आपत्तीचे असणार आहेत. अनेक राज्यात लोकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. अनेक ठिकाणी उष्णतेमुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत.

यामध्ये आता ईशान्य, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताचा काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. Weather Update
दरम्यान, हवामान खात्याने म्हटले आहे की, मे महिन्यात आणखी उष्णतेच्या लाटा येतील. अनेक राज्ये प्रचंड उष्णतेच्या चटक्यात असतील. यामुळे याचा मोठा परिणाम होणार आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
यामध्ये उष्णतेच्या लाटेचा जनजीवनावर लक्षणीय परिणाम होणार आहे. मे महिन्यात दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरात भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. यामुळे दुपारी बाहेर जाणे टाळावे, अशी माहिती देण्यात आली आहे.