Weather Update : सावधान! ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा..


Weather Update : राज्यात मान्सून नियोजित वेळे पूर्वी दाखल होऊन देखील समाधानकारक पावसाची प्रतिक्षा कायम आहे. जून संपून जुलै महिन्याला सुरुवात झाली तरी यंदा आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

सर्वत्र पावसाची प्रतिक्षा लागून असताना हवामान विभागाने २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अनेक भागात आकाश ढगाळ होते.

जुलै महिना सुरू होताच मान्सूनने देशभर हजेरी लावली आहे. यापूर्वी जूनमध्येच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यानंतर मुंबई उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. ह

वामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात आपत्ती ठरत आहे. पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरी अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. IMD नुसार, राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. Weather Update

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या मरिन ड्राइव्हवरही भरतीचा धोका निर्माण झाला आहे. टी-२० विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज भारतात परतली आहे. टीम इंडियाचा मुंबईत संध्याकाळी 5 वाजता रोड शो आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!