Weather Update : अवकाळीचा फटका अजून तीन दिवस बसणार, शेतकऱ्यांनो काळजी घ्या, हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती….


Weather Update : राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. प्रशासन अन् शासन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना शेतमालाचे नुकसान होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर अवकाळी पडल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास नष्ट झाला आहे. यामुळे आता नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आला आहे. दरम्यान, अवकाळीचे संकट अजूनही कायम असणार आहे.

राज्यात १३ ते १५ एप्रिल या तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ हवामान तज्ज्ञ मिलिंद फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे.

काही भागात तीव्रता जास्त आहे, तर इतर भागात सामान्य पाऊस पडत आहे. वादळ, वादळ, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. पुढील तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ, पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

१३ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (कधीकधी ३०-५० किमी प्रतितास वेगाने) हलका ते मध्यम पाऊस पडेल. अशी माहिती दिली आहे. Weather Update

पिकलेली पिके, फळे आणि भाजीपाला स्वच्छ हवामानात काढा आणि कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवा किंवा मध्य भारत, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शेतात कापणी केलेल्या उत्पादनांचे ढीग झाकून ठेवा, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!