Weather Update : राज्यात दोन दिवसांनंतर पुन्हा पावसाची विश्रांती, शेतकरी पुन्हा चिंतेत…
पुणे : राज्यात गेल्या महिन्यात पावसाने (Weather Update) दडी मारली होती. तर सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना (farmer) आहे. (Weather Update)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, कालपासून पुन्हा पावसाने एकदा विश्रांती घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.
मात्र आता पुन्हा एकदा पाऊस एक ते दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी केला आहे.
त्याचबरोबर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार नाही. तर मंगळवारी राज्यभर पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे..
वामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी लावणार नाहीये. तर, मंगळवारीही राज्यभरात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
बुधवारपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.