आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क बंगळुरु- हैदराबादला चाललंय!! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचाला झापलं…


पिंपरी चिंचवड : सध्या आपल्या पुणे जिल्ह्यातील आयटी पार्क म्हणून ओळख असलेले हिंजवडीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा अजित पवार हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत.

अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरू केली आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी जो कोणी आडवा येईल, त्याला 353 लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या संरपंचांना देखील खडेबोल सुनावले आहेत. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील अजित पवार यांनी सुनावले. ते म्हणाले, अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो.

आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय. माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर. बेंगलोरला हैदराबादला, काय तुम्हाला पडलं नाही. कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत. पणन हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हिंजवडीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अनेक तास प्रवासात जात आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याठिकाणी लक्ष घातले असून प्रशासन देखील कामाला लागले आहे. पावसामुळे देखील रोड खराब झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!