पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा सविस्तर…


पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात पावसाचा जोर असतानाच नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पर्वती जलकेंद्रातून आणि लष्कर जलकेंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या लाईनमध्ये आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामे करण्यात येणार आहेत.

त्यामुळे गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी संपूर्ण पूर्व पुणे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

लष्कर जलकेंद्र भाग..

सोलापूर रस्ता परिसर, हडपसर गावठाण, मातवबाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोडची डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्त्याचा उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची (संपूर्ण), भेकराई नगर, मंतरवाडी, बेकर हिल टाकी परिसर (कोंढवा खुर्द, वानवडी). (या भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा देखील बंद राहील).

       

भामा आसखेड योजना भाग…

शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाडेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटे नगर, विद्या नगर, मुरलीधर सोसायटी.

पाण्याचा जपून वापर करा…

पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा खंडित राहील आणि शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी गुरुवारी लागणारे पाणी आदल्या दिवशीच साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!