पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या..

पुणे : पुण्यात येत्या गुरुवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती येथील टाक्यांमधून पाणीपुरवठा होणाऱ्या सहकारनगरमधील काही भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी ६ फेब्रुवारी बंद राहणार असून शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती व जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील सहकारनगरमधल्या काही भागात पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहण्याची शक्यता आहे. पर्वतीमधील पाण्याच्या टाकीमधून होणारा पाणीपुरवठा ६ फेब्रुवारीला बंद राहणार आहे. त्यामुळे सहकारनगरमधील काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारी कमी दाबाने आणि सकाळी उशीरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तुळशीबागवाले कॉलनी, मेघना सोसायटी, सहकारनगर क्रमांक २ कमानीच्या आतला भाग, स्वानंद सोसायटी, गोविंद गौरव सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, नामदेव सोसायटी, लकाकी सोसायटी, अण्णाभाऊ साठे कॉलनी, शाहू कॉलनी, लक्ष्मीनगर मनपा शाळा १११ जवळच्या भागातला पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.