आळंदी-देहू रस्त्यावर पाण्याच्या पाइपलाइनच्या व्हाॅल्व्हमधून गळती, दुरुस्तीची मागणी…!


पुणे : येथील आळंदी पालिका हद्दीतील आळंदी-देहू रस्त्यावरील तेथील पेट्रोल पंपापासून जवळच असणाऱ्या पाण्याच्या पाइपलाईनच्या व्हाॅल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नाही.

रविवारी रात्री तेथील वॉटर व्हाॅल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन रस्त्याकडेने दूरवर पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत होते. तेथील पाण्याची टाकी भरण्यासाठी जलकेंद्रातून तिकडे पाणी जाते तेव्हा तेथील वॉटर व्हाॅल्व्ह मधून पाण्याची गळती होत असते.

यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकाने सांगितली. तसेच येथील वॉटर व्हाॅल्व्ह मधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करणे आवश्यक आहे, असे मत नागरिकाने व्यक्त केले आहे. यामुळे रोडवर अपघात घडण्याचे देखील शक्यता आहे. यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!