एका वर्षात 22 हजार अश्लील व्हिडिओ पाहिले, शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची गुगल सर्च हिस्ट्री आली समोर..

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी दत्तात्रय रगाडे याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सुनावणी सुरु आहे.

आरोपीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. यामध्ये आता दत्ता गाडेचा फोन तपासल्यावर उघड झालेल्या माहितीने त्याची मानसिकता किती खालच्या पातळीवर गेली हे लक्षात येतं. शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याने गेल्या वर्षभरात २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिले आहेत.
त्यामुळे आधी काही महिलांनी त्याच्यावर रस्त्यामध्ये अडवून गोड बोलून गाडीत बसवून आड मार्गी नेत अत्याचार करण्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ही बाब समोर आली. यावरून लक्षात येते की महिलांकडे तो किती वाईट नजरेने पाहत असेल.

या घटनेनंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. पोलिसांनी त्याचा जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. आरोपीने पीडितेला खोटे सांगून बसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले. त्या वेळी बसमध्ये कोणीही नसल्याने पीडिता खाली उतरत असताना, आरोपीने बसचे दोन्ही दरवाजे बंद करून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केले.
यामुळे मोठी खळबळ उडाली होती. जीवे मारण्याच्या धमकीने ती गप राहिली, यामुळे आरोपीने दोनला बलात्कार केला होता. दरम्यान, आरोपीच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, तो वारंवार स्वारगेट एसटी आगारात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे त्याला जामीन झाल्यास तो अशा प्रकारचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करण्याची शक्यता आहे; तसेच पीडिता, साक्षीदारांना तो धमकावू शकतो. त्यामुळे त्यांना जामीन न मिळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. यामुळे त्याला किती शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.