Washim Crime : महाराष्ट्राला हादरवणारी घटना! पेट्रोल ओतून झेडपी शिक्षकाला जिवंत जाळले, नेमके घडले काय?


Washim Crime वाशीम : वाशिमच्या मालेगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागातील झेडपी शाळेच्या शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना घडलीये. या हल्ल्यानंतर शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. Washim Crime

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावर कोल्ही शिवारात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Washim Crime

दिलीप धोंडोजी सोनवणे असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दिलीप सोनवणे मुळचे रिसोड तालुक्यातील बालखेडचे रहिवासी आहेत. ते बोरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. मालेगाव-आमखेडा रोडवर कोल्ही गावाजवळ दोन दुचाकीवरून काही अज्ञात इसम आले.

त्यांनी त्यांच्यावर रॉडने हल्ला केला आणि त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिले. या घटनेत शिक्षक दिलीप सोनवणे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, उपचारादरम्यान डॉक्टरांनी शिक्षक दिलीप सोनवणे यांना मृत घोषित केले.हवी हत्या वैयक्तिक वादातून केली असल्याची चर्चा सुरु आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!