राजकारणात खळबळ! एकनाथ शिंदेंसोबतही होणार होता घातपात? रोहित पवारांचा धडकी भरवणारा गौप्यस्फोट…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते.

यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याचे कळताच सर्वांना मोठा धक्का बसला.

आमदार रोहित पवार हे दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर वारंवार शंका उपस्थित करत आहेत. अपघाताचा घटनाक्रम आणि एका महिन्यानंतर यासंबंधीत चौकशी करणाऱ्या विविध संस्थांच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले आहे. कुणाच्या तरी दबावाखाली हा प्रकार घडल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. दादांचा घातपात झाल्याचा त्यांचा संशय आहे. त्यादृष्टीने त्यांनी आज चौथी पत्रकार परिषद घेतली.

आजच्या पत्रकार परिषदेत ही त्यांनी अनेक दावे केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तर अजितदादांसारखाच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत घडणार होता असा दावा त्यांनी केल्याने शिवसैनिक आणि आमदारांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे.

डीजीसीएच्या अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या अहवालाची चिरफाड करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीचे लागेबंध, त्यांच्याकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाकडेही रोहित पवारांनी लक्ष वेधले. या दरम्यानच त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही घातपात होणार होता का, असा सवाल केला आहे.

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना त्यांच्या विमानाचा ‘फ्लाईट प्लॅन’ योग्य नसल्यामुळे दोन देशांनी त्यांचे विमान पाडण्याची धमकी दिली होती. रोहित पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय प्रवास करताना फ्लाईट प्लॅन आणि संबंधित देशांची परवानगी आवश्यक असते. एकनाथ शिंदे हे दावोसला जात असताना त्यांचे विमान इराणच्या हवाई हद्दीत शिरले. त्यावेळी इराणने इशारा दिला की, जर तुम्ही विमानाचा मार्ग आत्ताच्या आत्ता बदलला नाही, तर आम्ही तुमचे विमान पाडू.

रोहित पवारांनी पुढे सांगितले की, इराणच्या इशाऱ्यानंतर हे विमान इराकच्या दिशेने वळवण्यात आले. मात्र, तिथेही तसाच प्रकार घडला. इराकनेही परवानगी नसल्याचे सांगत विमान पाडण्याची धमकी दिली. अखेर हे विमान बहरीनला उतरवण्यात आले आणि तिथे सर्व कायदेशीर परवानग्या पूर्ण केल्यानंतरच विमानाचे पुढील उड्डाण झाले.

रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी VSR कंपनीच्या कारभाराला जबाबदार धरले आहे. या कंपनीने उपमुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घातला होता का? असा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे अजित पवारांच्या विमानाबाबत प्रश्नचिन्ह आहे, तसाच काहीसा प्रकार एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडणार होता का?”असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!