आई-वडिलांचा आधार हरपला! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जात होता, वाटेत दुचाकी घसरली अन्…
पुणे : मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी चाललेल्या आयटीतील तरुणाचा कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातात जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.
आदित्य लाहोटी (वय. ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आदित्य कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगरमधील आकृती कंट्रीवुड्स या सोसायटीत राहत होता. तो एका खासगी आयटी कंपनीत कामाला होता.
घटनेच्या दिवशी ‘शनिवारी-रविवारी सुटी असल्याने आदित्य नियमितपणे बॅडमिंटन खेळण्यासाठी जात होता. रविवारीदेखील तो खेळण्यासाठी गेला होता.
तिथून घरी परत येत असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावर गोकुळनगरजवळील पॅरामाउंट सोसायटीसमोर त्याची बाईक घसरली.
यामुळे तो रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणारा मोठा ट्रेलर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात वडील, आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आदित्यच्या निधनामुळे लाहोटी कुटुंबासह त्याच्या सोसायटीवर शोककळा पसरली.