आज जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पहा हवामान अंदाज…!

पुणे : सध्या राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. तर काही भागातील तापमानात वाढ झाली आहे. आता पुढील दिवसांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक भागात मुसळधार पावसासह गारपिटी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
मराठवाडा, कर्नाटक महाराष्ट्र, छत्तीसगड, छत्तीसगडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेश, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडूमध्येही अपेक्षित आहे. देशाच्या इतर भागात पावसाची फारशी शक्यता नाही.
काही ठिकाणी पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा तयार झाला आहे. तर काही भागातील उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. पुढील 3 ते 5 दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.