राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ ठिकाणी होणार जोरदार पाऊस, जाणून घ्या..
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर पाण्याविना पिके जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
निम्मा ऑगस्ट महिना संपला तरीही राज्यातपावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. अशातच हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल. तसेच मराठवाड्याच्या वेगवेगळ्या परिसरात पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भामध्ये विजांच्या गडगटांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात पाऊस सुरु राहील.
दरम्यान, १३ ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे तिथे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.