धोक्याची घंटा! पुढील ७२ तास मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी…

पुणे : राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे. उर्वरित राज्यात देखील थंडी वाढल्याचे दिसून येतेय. राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागांसाठी मोठा हवामान इशारा जारी केला आहे. विशेषतः 26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई आणि पुण्यासह महानगरांमध्ये वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हवेची गुणवत्ता घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मुंबईतील AQI म्हणजेच हवेची गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत असून तो साधारणतः 100 ते 150 दरम्यान आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईत वातावरण उबदार आणि आर्द्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान साधारण 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, तर दुपारनंतर ते 32 अंशांपर्यंत पोहोचू शकते. दु
पारच्या वेळेस उकाडा जाणवण्याची शक्यता असून सायंकाळी हलका वारा किंवा तुरळक पावसाची शक्यता नाकारता येत नाही. रात्री मात्र तापमानात किंचित घट होऊन हवामान आल्हाददायक राहू शकते.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की सध्या हवामान अस्थिर असल्याने अचानक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, विशेषतः प्रदूषणामुळे त्रास होणाऱ्या नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने उत्तर भारत आणि ईशान्य भारतासाठीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. 26 ते 28 डिसेंबरदरम्यान उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या उंच भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे वाहतूक, पर्यटन आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.
