जेजुरीच्या खंडोबास उबदार कपड्यांचा साज, थंडीत मार्तंडाचे मनमोहक रुप..
जेजुरी : जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील मल्हारी मार्तंडास उबदार कपड्यांचा साज चढविण्यात आला आहे. आपल्या देवालाही उबदारपणा मिळावा म्हणून जेजुरी येथील खंडोबा देवाचे मानकरी आणि मल्हारराजे प्रतिष्ठानचे संचालक अध्यक्ष हरिदास आणि त्यांच्या पत्नी हर्षदा रत्नपारखी यांनी मल्हारी मार्तंड भैरव देवास ऊबदार वस्त्रांचा साज चढविला आहे.
खंडोबा देवाचा गाभारा पाकळणीनंतर खंडोबा म्हाळसा देवी देवतांच्या ऐतिहासिक मूर्तींना आणि मार्तंड भैरवास ऊबदार व वूलनचे कपडे परिधान करण्यात आले आहे. खांद्यावर घोंगडी ही परिधान करण्यात आली. असा सर्व ऊबदार साज खंडोबाला अर्पित करण्यात आला आहे.
हर्षदा रत्नपारखी यांनी स्वतः हाताने बाराबंदी, देवाची पगडी अशी वस्त्रे तयार केली आहे. त्यास चार महिन्याचा कालावधी लागला होता असे त्यांनी सांगितले आहे.
Views:
[jp_post_view]