VSR कंपनीच्या मालकाचा बोलवता धनी पटेल अन् मंत्री राम मोहन नायडू? कोणी केला गंभीर आरोप…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या अपघाताप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी खळबळजक आरोप केले आहेत.VSR कंपनीच्या मालकाचा धनी प्रफुल्ल पटेल आणि राम मोहन नायडू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळ्या वळण लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या विमाना अपघाताचा तपास आता सीआयडी करत आहे. या तपासात व्ही एस आर कंपनीच्या मालकाची कसून चौकशी केली जात आहे.या सीआयडी चौकशीत व्ही. के सिंग यांनी पायलट सुमित कपूरला जबाबदार धरलं असून सिंग यांच्यामागे बोलावता धनी प्रफुल्ल पटेल आणि मंत्री राम मोहन नायडू आहेत का? असा सवाल विकास लवांडे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताचा तांत्रिक तपास करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न न करता संबंधित कंपन्यांची फौजदारी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. व्ही. के सिंग यांना प्रफुल्ल पटेल आणि राम मोहन नायडू यांचे मार्गदर्शन असल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडीकडून सखोल चौकशी सुरू आहे. यासंदर्भात ‘व्हीएसआर’ कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा धक्कादायक जबाब नोंदवण्यात आला आहे. यानुसार त्यांनी पायलट वर बोट ठेवल आहे.
दरम्यान व्ही. के सिंग यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली असून त्यांनी या अपघातासाठी पायलट सुमित कपूर याची चूक असल्याचे संकेत दिले आहेत. ‘या प्रकरणात माझी काही चूक आढळल्यास मला कठोर शिक्षा करा.’, अशी भूमिका सिंग यांनी चौकशी दरम्यान मांडल्याच समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखीन काय वळण लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.