मतदानाची वेळ संपली! पुण्यात आतापर्यंत किती टक्के मतदान? विजयाचा कौल उद्या जनता देणार..

पुणे : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मोठ्या प्रमाणावर मतदान पार पडल. सकाळी साडेसात वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. मतदानाची वेळ आता संपली असून पुणे महापालिका निवडणुकीत साडे तीन वाजे पर्यंत 35 ते 40 टक्के मतदानात झाले आहे. सकाळी मतदान संथ गतीने होत होते. आता मात्र मतदानाचा टक्का वाढला आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या मतदानाची वेळ संपली असून पुण्यात दुपारी साडेतीन पर्यंत 39 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर पिंपरीत 40.50% मतदानाची नोंद झाली आहे. उद्या मतमोजणी होणार असून मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. पुण्यात होणार चौरंगी लढत होत असून महायुतीमध्ये असणारे तिन्ही पक्ष स्वंतत्र लढत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. आता जनतेचा कौल कोणाला असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.

पुण्यात 41 प्रभागांच्या 163 जागांसाठी लढत होत असून 1 हजार 155 उमेदवार रिंगणात आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभागांच्या 128 जागांसाठी लढत होत असून 692 उमेदवार उमेदवार रिंगणात आहे. आता जनतेचा कौल उद्या कोणाला असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
