कसबा मतदार संघातील मतदार का घटले ? चीनसारखी झाली पुण्यात परिस्थिती…!

पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघात मतदार घटल्याचे दिसून आले आहे. कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदार यादीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याबाबत अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या ६० वर्षांत चीनचा जन्मदर नीचांकी पातळीवर आला आहे, तसे पुण्यात झाले की काय? यामुळे मतदार घटले आहे, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपच्या कसबा मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने निवडणूक लागली आहे.
कसबा मतदार संघातील मतदार यादी जाहीर झाली. या मतदार यादीत २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये मतदार कमी झाले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२३ ची मतदार यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली. त्यानुसार कसब्यात १५ हजार २२५ मतदारांची संख्या कमी झाली आहे.

परंतु मतदार यादीतील नाव आधार क्रमांकाला जोडले जात आहे. यामुळे दोन ठिकाणी नावे असणाऱ्या मतदारांची नावे कमी झाली आहे. तसेच काही मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे यादीतून कमी झाली आहे. यामुळे मतदार यादीत मतदार कमी झाल्याची शक्यता आहे. आता मतदान किती होणार हे देखील लवकरच समजनार आहे.