मतदानाचा टक्का घटणार! मुंबईतील तब्बल 35 हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, सत्ताधाऱ्यांना फटका?

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच आता जुहू परिसरातील तब्ब्लल ३५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून जुहू परिसरातील २०० इमारतीमधील नागरिक आणि झोपडपट्टीधारकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आपल्या व्यथा मांडल्या. पण, कोणतंही यश आलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत जुहू परिसरात राहणाऱ्या २०० इमारतीमधील नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.


जुहू परिसर हा मिलिटरी रडार असल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे., अनेक वेळा याठिकाणी आंदोलनही पुकारली गेली. पण, समस्य अजूनही कायम आहेत. या परिसरात २०० इमारती धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. या इमारतीचं पुनर्विकास रखडलं आहे. पुनर्विकास होत नसल्यामुळे ३५ हजार लोकांचा आयुष्य धोक्यात आलं आहे, त्याामुळे या भागातील सोसायट्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जुहू येथील रुईया पार्क, कराची सोसायटी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ३५,००० मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या भागात अनेक सोसायट्यांच्या गेटवर ‘नो रीडेव्हलपमेंट, नो व्होट’ असे बॅनर्स लावले आहेत. सत्ताधाऱ्यांना याचा फटका निवडणुकीत बसणार आहे
