पुण्यातील ऐतिहासिक विश्रामबागवाड्याचे नूतनीकरण होणार
पुणे : ऐतिहासिक विश्रामबागवाड्याचे महापालिका प्रशासनाकडून नूतनीकरण करण्याचे काम घेण्यात आले आहे. तसेच या वाड्यात पुनवडी ते पुण्यनगरी या प्रदर्शनासोबत शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती नागरिकांना पाहता येणार आहेत.
दुसर्या बाजीरावांनी राहण्यासाठी म्हणून 1807 मध्ये 2 लाख रुपये खर्चून विश्रामबागवाडा बांधला होता. वाडा बांधण्यासाठी 6 वर्षे लागली. वाड्याची ही वास्तू 39 हजार चौरस फुटांची आहे.
वाड्याचे बांधकाम हे विटांचे आहे.
संपूर्ण वाड्यात सुरु व सागाच्या लाकडांचा वापर केलेला आहे. तीन चौक असणारा हा प्रशस्त वाडा असून, चारही बाजूंनी मोकळा असा मोठा चौक येथे आहे. या वाड्याला पेशवे व इंग्रज धाटणीच्या बांधकामाचे स्वरूप दिसून येते. हा वाडा 1921 साली महापालिकेने 1 लाख रुपये देऊन ताब्यात घेतला.
त्यानंतर महापालिकेने ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ प्रदर्शन, बहुतांश मोठा भाग पोस्ट ऑफिस आणि वरील मजला शासकीय ग्रंथालयासाठी वापरण्यात येत होता.