उरुळीकांचन येथील प्रसिद्ध कापड व्यावसायिक विष्णुशेठ पुरुषवानी यांचे निधन…!
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील प्रसिद्ध कापड व्यापारी विष्णु क्लॅाथ स्टोअर्सचे मालक विष्णुदासशेठ केवलमल पुरूषवाणी यांचे वयाच्या ९२ वर्षी अल्पशा आजाराने पहाटे दुखत निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तिन मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उरुळी कांचन येथील बाजारपेठेतील विष्णू क्लॅाथ स्टोअर्स नावाने त्यांनी व्यावसाय परिसरात फुलविला होता.
या बाजारपेठतील व्यावसायिक वाढीत या दालनाचा मोठा वाटा राहिला. डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक खेमचंद विष्णुदास पुरूषवाणी यांचे वडील होत.
Views:
[jp_post_view]