Viral Video : मुंबई लोकलमध्ये तरुणीचा राडा! अश्लील व्हिडिओ केले व्हायरल, व्हिडिओत नेमकं काय?


Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी नेटकरी कायम नवीन प्रयत्न करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. नेटकरी कोणत्याही ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा चालू करत डान्स करू लागतात.

सध्या मुंबईच्या लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक मुलगी भोजपुरी गाण्यावर अश्लील डान्स करत असल्याचे दिसत आहे.

तरुणी अतिशय अश्लील डान्स करताना दिसत आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी भोजपुरी गाण्यावर कसा अश्लील डान्स करत आहे आणि हे सर्व मुंबईच्या खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये होत आहे.

सोशल मीडियावर दररोज असे व्हिडीओ व्हायरल होतात, कारवाई होऊनही लोक असे कृत्य करणे टाळत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. Viral Video

दरम्यान, @mumbaimatterz नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ४९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. सध्या सोशल मीडियावर तरुणीची चर्चा रंगली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!