Viral Video : नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही.. तीन लेकरांची आई हट्टाला पेटली अन् विजेच्या खांबावर चढली, पुढं काय झालं?
Viral Video : चोराच्या उलट्या बोंबा हा वाक्यप्रचार तुम्ही एकलाच असेल, याची अनेक उदाहरणेही तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. असंच आणखी एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका महिलेचे अनैतिक संबंध झाले. त्यानंतर ती चक्क विजेच्या खांबावर चढली. विशेष बाब म्हणजे या महिलेला तीन मुले आहेत. तिचे मागील सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही गोष्ट तिच्या पतीला समजताच त्याने त्यांच्या प्रेमसंबंधास विरोध करण्यास सुरुवात केली.
यानंतर महिला तिच्या पतीला आत्महत्येची धमकी देऊ लागली. मला नवरा आणि प्रियकरासोबत राहायचं आहे, असे म्हणत ती महिला थेट विजेच्या खांबावर चढली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
ज्यात महिला विजेच्या खांबावर चढत आहे. स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी करून तिची समजूत काढून तिला खाली उतरवले आहे. सध्या ती सुखरूप असून या घटनेची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. Viral Video
दरम्यान ,शेजारच्या गावातील एका तरुणासोबतचे महिलेचे अवैध संबंध तिच्या पतीने नाकारल्यानंतर महिलेने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. महिनाभरापूर्वी तिनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापूर्वीही महिलेच्या प्रियकराने रेल्वे रुळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.