Viral : गणपती मिरवणुकीत नाचण्यासाठी अर्जंट माणसं हवी, पुण्यात जाहिरात व्हायरल, पैसेही मिळणार, जाणून घ्या..


Viral पुणे : गणपती विसर्जनाला थोडे दिवस राहिले आहे, यावेळी मिरवणुकीत नाचण्याची मजा वेगळीच असते. काही प्रसिद्ध गणपतींच्या मिरवणूका तर १०-१० तास सुरू असताना दिसतात. या मिरवणूकींचे थेट प्रक्षेपण वृत्तमाध्यमांवरही केले जाते. त्यामुळे गेल्या काही काळात आगमन सोहळ्यांसोबतच आता विसर्जन मिरवणूकींनाही एक वेगळ्याच प्रकारची प्रसिद्धी मिळू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर गणपती मिरवणूक संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral)होत आहे. “मिरवणूकीत डान्स करण्यासाठी अर्जंट माणसे हवी अशी ही जाहिरात आहे. या जाहिरातीवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना प्रश्न पडलाय, खाण्या-पिण्याची काही सोय केलीये का नाही?

ही जाहिरात @PuneriSpeaks या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात नाचण्यासाठी १८ ते ३० वयोगटातील माणसे हवी, अशी ही जाहिरात आहे. ही विसर्जन मिरवणूक येत्या २७ सप्टेंबरला असून नाचणाऱ्यांना ३०० रुपये दिले जातील असा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे.

शिवाय इच्छूकांसाठी फोन नंबर देखील देण्यात आला आहे. ही जाहिरात नेमकी कुठल्या वर्तमानपत्रात देण्यात आली होती या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण ही जाहिरात सोशल मीडियावर मात्र चर्चेत आहे. नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!