Viral News : आता पत्नीला सेकंड हॅन्ड म्हणने पडेल महागात, नवऱ्याला 3 कोटी भरपाई देण्याचे आदेश, नेमकं घडलं काय?


Viral News : नवरा बायकोचे नाते काही वेगळे असते. अनेक जण आपल्या जोडीदाराची गंमत जंमत करत असतात. काही वेळा ही गंमतजंमत खेळीमेळीच्या वातावरणात होते. तर काही वेळा याचे उलट परिमाण देखील होतात. अशा बोलण्यामुळे जोडीदार दुखावून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते.

अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीला सेकंड हँड बोलणे चांगलेच महागात पडले आहे. दुखावलेल्या पत्नीने थेट कोर्टात धाव घेतली असून कोर्टाने पतीला त्याच्या पत्नीला ३ कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नीला तीन कोटींची भरपाई तसेच दरमहा दीड लाख रुपयांची भरपाई देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने पतीला दणका दिला. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यासह नेपाळमध्ये हनिमूनदरम्यान ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवले होते.

न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पतीचे अपील फेटाळले. कौटुंबिक हिंसाचारामुळे पत्नीच्या आत्मसन्मानाला धक्का बसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. Viral News

त्या तक्रारीच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाने पत्नीसाठी पर्यायी घराची व्यवस्था करण्याचे आदेश पतीला दिले होते. याचवेळी तिला पतीकडून दरमहा घरभाडे म्हणून ७५ हजार रुपये तसेच तीन कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि दीड लाख रुपयांची पोटगी मंजूर केली होती.

पतीने या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे अपील फेटाळल्यानंतर पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तथापि, पतीने १९९४ मध्ये लग्न झाल्यापासून २०१७ पर्यंत सातत्याने पत्नीचा मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळ केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून सरळसरळ स्पष्ट होते. या छळाला पंटाळून पत्नीला नऊ वर्षे माहेरी राहावे लागले.

या काळात पतीने तिला दैनंदिन खर्चासाठी पैसे देण्याचीही जबाबदारी सांभाळली नाही हे कनिष्ठ न्यायालयाने काढलेले निष्कर्ष योग्यच आहेत, असे मत व्यक्त करीत न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पतीची याचिका फेटाळली. या प्रकरणात अ‍ॅड. आशुतोष कुलकर्णी यांनी ‘अ‍ॅमिकस क्युरी’ म्हणून न्यायालयाला सहाय्य केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!