बारामती विमानतळावर नियमांचे उल्लंघन? 2025च्या ऑडिट रिपोर्टमधुन धक्कादायक माहिती उघड..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावरील अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.आता 2025 मध्ये बारामती विमानतळाबाबत केलेल्या ऑडिटच्या निरीक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानतळावर नियमांचं उल्लंघन झालं असून अहवाल सुपूर्द करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विमानतळाबाबत आता अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बारामती वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा सध्याचा ताबा हा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे आहे. त्यानुसार 2025 च्या विमानतळाबाबतच्या ऑडिटमधून जी निरिक्षणं समोर आली आहेत. त्यामध्ये विमानतळ असणाऱ्या नियमात बारामती विमानतळ बसतच नाही.त्याची धावपट्टी 2500 मीटर असणं गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात याठिकाणची धावपट्टी 1700 मीटरच आहे. त्यामुळे त्याला विमानतळ नाही तर वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणावे लागेल असे ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बारामती विमानतळा बाबतचा हा रिपोर्ट मे-जून 2025 राज्य सरकारच्या गोपनीय यंत्रणांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दिलेला होता. मद्रास अहवाल सादर होऊनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आली नाही.तसेच विमानतळावर एटीसी यंत्रणाच नाही.तसेच शासन नियंत्रण स्वतंत्र एटीएस कंट्रोल टॉवर नाही. उड्डाण नियंत्रणाची सुविधा प्रामुख्याने खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांकडून कार्यान्वित असल्याचे ऑडिटच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बारामती विमानतळ परिसरात आवश्यक त्या संख्येने वॉच टॉवर उपलब्ध नाहीत. परिघीय सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे ऑडिट निरीक्षणात अधोरेखित करण्यात आले आहे. विमानतळावर वॉल कम्पाऊंड आणि वॉच टॉवरही नाही.स्वत:ची अग्निशमन यंत्रणाही नाही. बारामती विमानतळ हे विमानतळ नाही तर आपत्कालीन धावपट्टी आहे असे ऑडिट रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

बारामती विमानतळ बाबतच्या या धक्कादायक ऑडिट मधून आलेल्या माहितीने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या विमान अपघाताला या विमानतळाच्या सुरक्षेवर आणि कारभारावर देखील जबाबदार धरले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!