ब्रेकिंग ! संजय राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंग कारवाईत सर्वात मोठी अपडेट….!
मुंबई : विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत. विधिमंडळाला हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे”, अस म्हणणाऱ्या संजय राऊत यांना हक्कभंग समितीने नोटीस पाठविली आहे.
संजय राऊत यांच्या विधानानंतर सत्ताधारी आक्रमक झाले असून विधानसभेच्या अधिवेशनातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आता राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावर विचार करण्यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून आता राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान बुधवारीचं त्यांना नोटीस बजावण्यात आल्याच पुढे आलं आहे. त्यामुळे राऊत यांना आजच उत्तर द्याव लागणार आहे. लेखी खुलासा करण्यासंदर्भात सांगण्यात आलं असून कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
Views:
[jp_post_view]