Vinod Patil : याचिकाकर्ते विनोद पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, कोणताच निर्णय झाला नाही, विनाकारण…


Vinod Patil : राज्यात काल मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जीआर स्वीकारल्यानंतर रात्री अंतरवाली सराटीत पोहोचले.

यावेळी मोठा जल्लोष कर करण्यात आला. असे असताना मराठा अध्यादेशाला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. यावर आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

ते म्हणाले, मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं म्हणणं चुकीचं असून एक मंत्री म्हणून भुजबळांनी असे बिनबुडाचे विधानं करु नये. यामुळे वेगळा संदेश जात आहे. त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं, खरोखरच मराठा ओबीसीमध्ये आला आहे का? आईही ते म्हणाले.

खरोखर ५४ लाख नोंदींनुसार प्रत्येकी ४ जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे का? तुम्हाला सर्व माहिती आहे, विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. असेही त्यांनी म्हणत भुजबळांवर टीका केली आहे. आता भुजबळ काय उत्तर देणार हे लवकरच समजेल. Vinod Patil

मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी कोणताच निर्णय झाला नाही. सर्व मराठ्यांना अजूनही आरक्षणाचा लाभ मिळाला नसल्याने विनाकारण न्यायालयाची भाषा का करता? असा देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!